Directory

विकिपीडिया:मिडिया सहाय्य - विकिपीडिया Jump to content

विकिपीडिया:मिडिया सहाय्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विकिपीडियावरील मिडिया संचिका

[संपादन]
काही विकिपीडिया लेखांमध्ये ध्वनी व चलचित्र संचिका वापरल्या गेल्या आहेत.

काही विकिपीडिया लेखांमध्ये ध्वनी व "चलचित्र (व्हिडियो" संचिकांचा वापर करण्यात आला आहे. ह्या संचिका साधारणपणे सध्या वापरात असलेल्या जवळजवळ सर्व संगणकांवर ऐकल्या/पाहिल्या जावू शकतात. परंतु जर आपल्या संगणकावर योग्य प्रणाली (सॉफ्टवेअर) अस्तित्वात नसेल तर इंटरनेटवर उपलब्ध असलेली मोफत प्रणाली डाउनलोड करून आपणाला ह्या संचिका वापरता येतील.

विकिपीडियावर साधारणपणे "ओजीजी (Ogg)" हे एक्स्टेन्शन असलेल्या ध्वनी व व्हिडियो संचिका आहेत. ओजीजी स्वरूप असलेल्या संचिका संपूर्णपणे खुल्या असतात व भविष्यकाळातील प्रणालीच्या विकासासाठी पोषक असतात. परंतु मायक्रोसॉफ्ट विंडोजमॅक कार्यप्रणाली असलेल्या संगणकांना काही विशिष्ट सॉफ्टवेअर डाउनलोड करावे लागू शकते. अधिक माहितीकरिता इंग्लिश विकिपीडियावरील हा लेख पहावा.