Directory

नाम - विकिपीडिया Jump to content

नाम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


नाम व नामाचे प्रकार

एखाद्या प्राण्याच्या,वस्तूच्या किंवा काल्पनिक गोष्टीच्या नावाला नाम असे म्हणतात.हा [] एक शब्द आहे जो विशिष्ट वस्तू किंवा वस्तूंच्या संचाचे नाव म्हणून कार्य करतो, जसे की सजीव प्राणी, ठिकाणे, क्रिया, गुण, अस्तित्वाची स्थिती किंवा कल्पना.नाम असे शब्द आहेत जे लेख आणि गुणविशेषण विशेषणांसह उद्भवू शकतात आणि संज्ञा वाक्यांशाचे प्रमुख म्हणून कार्य करू शकतात.

नामाचे प्रकार

[संपादन]
           १. सामान्य नाम.
           २. विशेष नाम
           ३. भाववाचक नाम

१. सामान्यनाम

[संपादन]
            एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला मिळालेले नाव म्हणजे सामान्य नाम होय.
उदा० मुले, मुली, शाळा,दुर्गेश. इत्यादी.

२. विशेषनाम

[संपादन]
           जे नाम एकाच जातीच्या विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध करते त्या नावाला विशेष नाम असे म्हणतात.
उदा० रामदास, गंगा, यमुना, हिमाचल, इ.

३. भाववाचक नाम

[संपादन]
             ज्या नामामुळे एखाद्या प्राण्यामधील किंवा पदार्थामधील गुणांचा, भावांचा अथवा धर्माचा बोध होते त्या नामाला भाववाचक नाम असे म्हणतात.
उदा० आनंद, दुःख, इत्यादी...

हे सुद्धा पहा

[संपादन]
  1. ^ "Noun In Marathi | Noun Definition, Types, Examples - Study Troopers" (इंग्रजी भाषेत). 2022-06-15. 2022-06-15 रोजी पाहिले.